विविध विकासकामांसाठी ९० लाखांचा निधी मंजूर – आमदार निलेश लंके

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नागरी सुविधा योजना तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिले. दरम्यान पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे जिल्हा रूग्णालयात रूपांतर करणे तसेच ढवळपुरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही लंके यांनी सांगितले.

लंके म्हणाले, निघोज, पाडळीरांजणगांव, सांगवी सुर्या, वडझिरे, जखणगांव तर हवालदार वस्ती ते गवराम ढवळे यांच्या घरापर्यंत रस्त्याची सुधारणा, राळेगण थेरपाळ येथे गावांतर्गत विद्युतीकरण करणे,

जवळे येथे ठाकर वस्ती रस्ता काँक्रीटीकरण तर ढवळपुरी येथे गावांतर्गत विद्युतीकरणआदह कामांसाठी निधी मंजुर करण्यासंदर्भात आ. लंके यांनी दि. ७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना पत्र दिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेण्यात येउन या कामांना निधी मंजूर करण्यात आला.

आरोग्य विभागाची ऑनलाईन बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीस आ. नीलेश लंके यांनी ऑनलाईन हजेरी लावत पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच नविन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहीती दिली. दोन्ही कामांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश पवार यांनी या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.