अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या संस्थेत ९७ कोटींचा अपहार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ९७ कोटी ५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. या पतसंस्थेचे २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे फेर लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात असून त्यात ही बाब पुढे आली आहे.

या अपहारास पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक व अकाउंटंट यांना जबाबदार धरण्यात आले असून विशेष लेखा परीक्षकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,

की ठेवीदारांना देण्यासाठी पैसे शिल्लक नसल्याने मागील वर्षी अचानक ही पतसंस्था चार दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. पतसंस्थेमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याची चर्चा सुरू झाली होती. पतसंस्थेमध्ये कर्मचाऱ्यांनी आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी शहर पोलीस ठाण्यात व जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती.

यानंतर या पतसंस्थेचे पाच वर्षांचे फेर लेखापरीक्षण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.यानुसार या पतसंस्थेचे फेर लेखापरीक्षण वर्षभरापासून सुरू आहे. याचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. फेर लेखापरीक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचा झाल्याचे निदर्शनास आले आहे.

संस्थेच्या रेकॉर्डनुसार पाच वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, अपहार तसेच आर्थिक अनियमितता आढळुन आलेल्या आहेत. त्यामुळे संस्थेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याची बाब निर्दशनास आली.

विशेष लेखापरीक्षकांनी संचालकांना दिलेल्या नोटिसीनुसार दूधगंगा पतसंस्थेमध्ये ७९ कोटी २४ लाख २९ हजार १६५ रुपयांचा आर्थिक अपहार व १९ कोटी ३२ लाख ९० हजार ७३० रुपयांचे आर्थिक नुकसान,

असे एकूण ९८ कोटी ५७ लाख १९ हजार ८९५ रुपयांचा अपहार झाला असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान संचालकांनी अहमदनगर येथे जाऊन लेखापरीक्षांकडे आपले म्हणणे सादर केले आहे. आर्थिक गैरव्यवहारामध्ये आपला संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office