१३ वर्षीय अल्पवयीन मुलाने ५ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना नगर शहरातील उपनगरात घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी बुधवारी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरूध्द अत्याचार, पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची घटना सोमवारी घडली. फिर्यादीने त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला खेळण्यासाठी सोडले असता खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार त्या अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांना सांगितला.
त्यानंतर त्यांनी बुधवारी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक विकास काळे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे सहायक निरीक्षक विकास काळे यांनी सांगितले.