14 वर्षाची मुलगी घरातुन निघुन गेली,पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याची केली नोंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : घरात कोणाला काहीही एक न सांगता 14 वर्षाची मुलगी घरातुन कोठेतरी निघुन गेली आहे. ती अद्याप परतली नाही. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कायनेटिक चौकातील 14 वर्षीय विद्यार्थिनी घरात कोणालाही काहीही न सांगता कोठेतरी निघुन गेली. ती अद्याप परतली नाही.

तिच्या घरच्यांनी नातेवाईक व तिच्या मैत्रिणी व आजुबाजु परिसरात शोध घेतला परंतु ती कोठेही मिळुन आली नाही तसेच तिचा काहीही थांगपत्ता न लागल्याने त्यांनी अज्ञात व्यक्ती विरूध्द अपहरणाची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 363 प्रमाणे अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24