अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अर्जुन काशिनाथ केदार (वय १५, नांदुरखंदरमाळ, ता. संगमनेर) असे मुलाचे नाव आहे. शनिवारी (१३ एप्रिल) दुपारी ३ वाजता येठेवाडी शिवारातील रोडे वस्तीच्या रोडवर हा अपघात झाला.

अर्जुन शेतातील कांदे काढण्यासाठी मजुर बघण्याकरिता येठेवाडी येथील रोडे वस्तीवर गेला होता. अर्जुन याला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातानंतर ते वाहन निघुन गेले. काशिनाथ केदार यांना माहिती मिळाल्यानंतर अर्जुनला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्जुनच्या शवविच्छेदनानंतर त्याच्यावर नांदुरखंदरमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

काशिनाथ केदार यांनी बुधवारी (१७ एप्रिल) घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकावर मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अर्जुनच्या अपघाती मृत्यूने नांदुरखंदरमाळच्या ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe