दुचाकीच्या धडकेत सत्तर वर्षीय वृद्ध ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- बीड रोडवरील हापटवाडी रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्या एका वृध्दास जोरात धडक दिल्याने यात वृध्दाचा मृत्यू झाला.

यात बापू दगडू वाघमारे (वय ७० वर्षे रा.मोहा, ता.जामखेड) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बापू दगडू वाघमारे रात्री जामखेड येथुन मोहा गावी रस्त्याच्या कडेने पायी चालले होते. याच दरम्यान मोटारसायकल वरुन जाणाऱ्या

दत्तात्रय पांडुरंग येवले (रा. यवलवाडी. ता.पाटोदा. जिल्हा. बीड) याने या वृध्दास मोहा जवळील हापटवाडी येथील लक्ष्मी थेटर जवळ पाठीमागून येऊन जोराने धडक दिली. त्यामुळे या अपघातात वृध्दाचा मुत्यू झाला.

यानंतर दि.28 रोजी मयताचा मुलगा सुनील बापु वाघमारे, (रा. मोहा )यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. के. बी. कोळपे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24