देशातील गरीब, महिला, शेतकरी आणि युवा या चार घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचे लाभ या वर्गातील अखेरच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या संकल्पास पुरेपूर पाठबळ देऊन सरकारसोबत राहण्याची ग्वाही देणारा अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्राने देशाच्या विकासाच्या वाटचालीत आपला सहभाग स्पष्ट केला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या सुचनेनुसार आज नगर शहरातील सावेडी मंडळ आयोजित बैठक माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, महानगर अध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, जेष्ठ नेते वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी, सावेडी मंडळ अध्यक्ष नितीन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हयातील शेतकऱ्यांच्या समस्यामुक्तीसाठी भरघोस मदतीची हमी देतानाच सौरउर्जा पंप देण्याची महायुती सरकारची घोषणा राज्याच्या कृषी क्षेत्रास संजीवनी देणारी ठरणार आहे.
मागेल त्याला सौरऊर्जा पंप आणि अखंडित वीजपुरवठ्याची हमी देणाऱ्या सरकारच्या या योजनेमुळे तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमुळे समस्याग्रस्त शेतकऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील ४४ लाख सहा हजार शेतकऱ्यांना या योजनेमुळे साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरविली जाणार असल्याने, हवामान बदलामुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात मिळाला आहे असेही त्यांनी नमूद केले.
सावेडी मंडळाच्या बैठकीत माजी नगरसेवक नितीन शेलार यांनी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घेण्याचा ठराव केला त्यास सीए, राजेंद्र काळे यांनी अनुमोदन दिले. विधानपरीषदेच्या विजयी उमेदवाराचा ठरावाला सर्वानुमते अनुमोदन दिले.
यावेळी सचिन पारखी, प्रशांत मुथ्था, गोपाल वर्मा, रविंद्र बारस्कर, अशोक गायकवाड, सी ए राजेंद्र काळे, अनंत देसाई, रामदास आंधळे, मनोज दुल्लम, अनिल ढवण, संदीप कुलकर्णी, निशांत दातीर, करण कराळे, सोमनाथ चिंतामणी, पल्लवी जाधव, वंदना पंडित, अर्चना बनकर, मनोज ताठे, पप्पू गर्जे,
आकाश सोनवणे, संदीप जगदाळे, मंगेश निसळ, ओंकार लेंडकर, रोहन ढवण, साहिल शेख, बाबा सानप, अनिरुद्ध घैसास सुजित खरमाळे, राजू मंगलारप, शिंदे, संपत नलावडे, बाळासाहेब गायकवाड, सतिश शिंदे, अभिजित वाकळे, वैभव झोटींग, बंटी डापसे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.