अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात पोलिसांच्या आशिर्वादाने सर्रास बैलगाडा शर्यती भरविण्यात येत आहेत. विशेषबाब म्हणजे बैलगडा शर्यतींवर न्यायालयाने बंदी घातलेली आहे.
यातच असा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. अलिकडेच पारनेर पोलिसांनी रेनवडी येथे अशा शर्यती घेण्यास संमती दिली होती. मात्र तक्रार करण्यात आल्यानंतर त्या तात्काळ बंद करण्यात आल्या.
रेनवडी येथील प्रकार ताजा असतानाच राळेगणथेरपाळ येथेही अशा शर्यती घेण्यास देण्यात आलेली परवाणगी म्हणजे त्यात दलाली करणारे कीती पोहचलेले आहेत याची प्रचिती येते.
बैलगाडा शर्यती घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केलेली आहे. अशा शर्यतींना परवाणगी मिळावी यासाठी विशेषतः पुणे जिल्हयातील गाडा मालक आग्रही आहेत.
बैलगाडा शर्यतीविषयी नागरीकांमध्ये आकर्षण आहे. बंदीमुळे शैकिनांचा हिरमोड झालेला आहे. तीच संधी साधून स्वतःच्या तुमडया भरण्याचे उदयोग पारनेर पोलिस ठाण्यातील काहीजण करीत आहेत.
गोरगीब व्यक्तीने जराही चुक केली तर त्याच्यासोबत कायद्याची भाषा केली जाते. खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जाते.
विशेषतः अशी दलाली करणारेच त्यात पुढे असतात. गोरगरीबांना कायद्याची भाषा तर धनीकांना पायघडया अशी अवस्था सध्या पारनेर पोलिस ठाण्याची आहे.