सोनाराच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पुन्हा एकदा अशीच एक चोरीची घटना घडलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण मध्ये एका सोनाराच्या दुकानावर चोरटयांनी डल्ला मारून लाखोंचा माल लंपास केला आहे.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवदैठण गावात रेणुका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.

या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दुकानाचे काउंटर मधील सोने – चांदीचे दागिने चोरून नेले आहे.

या प्रकरणी फिर्यादी पंकज किसन डहाळे (वय २६ रा. शिरूर) यांच्या फिर्यादीवरून बेलवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी घटनेची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार ही करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24