Ahmednagar News | मालवाही पिकअप विजेच्या पोलवर धडकली

Ahmednagarlive24 office
Published:

पाथर्डी तालुक्‍यातील कासार पिंपळगाव परिसरातील रस्त्यावरील इरिगेशन कॉलनी येथील विजेच्या खांबाला (दि.२४) रोजी मालवाहतूक पिकअपने धडक दिल्याने सात पोलबरील गाळूयांच्या विद्युत वाहक तारांचे नुकसान झाले आहे.

सदर पिकअप आदिनाथनगर, वृद्धेश्‍वर कारखाना येथून वाघोलीकडे जात होती. पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने गाडी वीजवाहक पोलवर धडकल्याने महावितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. वाहन चालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही; परंतु वाहन खांबाला धडकल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे,

अशी माहिती महावितरण कर्मचारी अनिल राजळे यांनी दिली. महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी भेट दिली तसेच विद्युत वाहक तारा ओढण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेस वाहन चालक जबाबदार असल्याचे महावितरण कर्मचारी अनिल राजळे यांनी सांगितले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe