अहमदनगर बातम्या

स्टेटसला औरंगजेबाचा फोटो आणि आक्षेपार्ह गाणे ठेवल्याने ‘त्या’तरुणाविरोधात गुन्हा दाखल !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : स्टेटसला औरंगजेबाचा फोटो ठेवून आक्षेपार्ह गाणे लावण्यात आले. या घटनेमुळे राहुरी तालूक्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. ही घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दिनांक ६ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की कन्हैय्या भरत दिघे हा तरूण राहुरी तालुक्यातील धानोरे येथील रहिवाशी आहे. या घटनेतील आरोपी अलबश्क नबीन शेख ( राहणार सात्रळ) हा त्याच्या ओळखीचा आहे.

दिघे हा दिनांक ७ ऑगस्ट रोजी त्याच्या मोबाईलवर स्टेटस पाहत असताना अलबरक शेख याने वादग्रस्त गाणे असलेला व औंगजेबाचा फोटो घेऊन नाचत असलेल्या मुलाचा स्टेटस ठेवलेला पाहिला.

त्यावेळी दिघे याने त्याचे सोनगाव, सात्रळ येथील मित्र सुमीत अशोक जेजुरकर, अमोल राजेंद्र दिघे यांना स्टेटस दाखवला. अलबरक शेख याने जाणीवपूर्वक दोन जातीमध्ये तसेच दोन धर्मामध्ये द्वेष पसरविण्याचे आणि दोन धर्मामध्ये शत्रुत्व वाढेल, ऐकोपा टिकवून ठेवण्यास बाधा येईल,

अशा आशयाचा व्हास्टॲप स्टेटसला ठेवल्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे कन्हैय्या दिघेने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी अलबरक नबीन शेख

याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोणताही विचार न करता मनमानी करून कोणीही सोशल मीडियात कोणतीही पोस्ट व्हायरल करेल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल. अशा प्रत्येक इसमावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office