अहमदनगर बातम्या

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बेलापूर येथील आरोपीस अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर-ऐनतपूर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेले होते.

सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्याठिकाणी पोहोचले. नातेवाईकांनी त्या मुलीस पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी पळवून नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले.

याबाबत बेलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील व हवालदार लोटके करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office