अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुल्लडबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपुरात घडला आहे.
दरम्यान याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुमारे 60 ते 65 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पैगंबर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद मिरवणूक वेस्टर्न चौकात शांततेत पार पडली. विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीत सामील झालेला
घोडा परत छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सैलानीबाबा दर्गा, गिरमे चौक, वॉर्ड नं. 3 येथे निघाला असता ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील काही तरुणांकडून गोंधळ घालण्याचा प्रकार केला गेला. यामध्ये शोएब कुरेशी (रा. वॉर्ड नं. 2), सैफअली शेख (रा. वॉर्ड नं. 1), रजीक असिफ शेख, (रा. वॉर्ड नं. 1), मकसूद शेख, सोनू शहा,
शेख जब्बार सय्यद, (रा. लोणार गल्ली, वॉर्ड नं. 6), अरबाज जब्बार सय्यद, (रा. लोणार गल्ली), मुनच्युन सादीक मलिक, (रा. वॉर्ड नं. 2), अमीर राजू सय्यद, (रा. लोणार गल्ली), समीर मोहंमद सय्यद, (रा. लोणार गल्ली, वॉर्ड नं. 6), इम्रान पठाण, अल्ताफ पठाण, तरबेज पटेल, तोहित खान, तन्वीर खान,
सद्दाम शेख, इमदाद मिर्झा, जावेद सय्यद, साजिद सय्यद, युसूफ सय्यद, अरबाज शेख, शाहरुख शेख, शाहरुख बागवान, दाऊद तांबोळी, ओसामा जमादार, आदिल मलिक, तौफीक तांबोळी, नेहाल मन्सूर शेख, मुंतुजर कुरेशी, सोहेल शेख, बारीक उर्फ शादाब पठाण, सलीम कुशनवाला,
सुफीयाना कुरेशी, (सर्व रा. श्रीरामपूर शहर) यासह अन्य अनोळखी 30 ते 35 तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गोंधळ घातला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ रमीज राजा रफीक आत्तार यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी 60 ते 65 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.