Ahmednagar News : संतोष याने मला चाकू मारला, असे सांगून डायल ११२ वर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भीमराव बावणे (वय २७, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोकॉ. संदीप म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की. दि. २८ रोजी मी व पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, ड्युटीवर हजर असताना रात्री साडेनऊच्या दरम्यान संतोष याने चाकू मारला, असे डायल ११२ वर कॉल करून सचिन भीमराव बावणे याने फोनवर सांगितले व आपला आपला मोबाईल बंद केला.
आम्ही सदर मोबाईल नंबरची माहिती घेऊन फोन केलेल्या इसमाच्या घरी गेलो असता, सदर इसमाने त्याचे सचिन भीमराव बावणे, रा. खिळे गल्ली, बोधेगाव, ता. शेवगाव असे सांगितले.
बावणे याला बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रात आणल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती विचारली असता, त्याने अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर आरोपीविरुद्ध शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. नानासाहेब गर्जे करत आहेत.