अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- राहाता तालुक्यातील साकुरी येथील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी पीडितेने म्हटले आहे, एक वर्षापूर्वी येवला तालुक्यातील भुलेगाव येथे आत्याकडे गेले असता नात्यातील ॠषिकेश गायकवाड, मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांचेशी ओळख झाली.
त्यानंतर ऋषिकेश गायकवाड याने माझा नंबर नातलगाकडून घेतला. त्यानंतर मोबाईलवर, व्हॉट्सअॅपवर संभाषण व चॅटींग करत होता. त्यास नाकारले तेव्हा त्याने हाताला दुखापत करून माझ्या मोबाईलवर मेसेज पाठवले.
भीतीपोटी मी घरात सांगितले नाही. त्यानंतर ऋषिकेश गायकवाड त्याचे जोडीदार मंगेश धिवर व अंकुश वानखेडे यांच्या साथीने माझा पाठलाग करत. त्यामुळे त्यादिवशी कोणालाही न सांगता रागाने निघून गेले होते.
राहाता पोलीस ठाण्यात मिसींग दाखल असल्याचे समजल्यानंतर पाहुण्यांच्या येथून घरी आले. घरच्यांना तिघे त्रास देत असल्याचे सांगितले.
ऋषिकेश मोबाईलवर प्रपोज करून लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे व चॅटींग करत धमकावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार करत असल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.