अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-राज्यात सध्या वीजबिल मुद्यावरून राजकारण तापले आहे. तसेच वीजबिले माफ करण्यात यावे यासाठी नागरिक आंदोलन करत आहे तर दुसरीकडे महावितरण वीजबिल वसुलीसाठी आक्रमक मोहीम राबवत आहे.
यातच महावितरणकडून वीजचोरांवर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला आहे. नुकतेच श्रीगोंदा मध्ये एक वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
वीजमीटरमध्ये वीज युनिटची नोंद होणार नाही, अशी व्यवस्था करून २ लाख २१ हजार रुपये किमतीची एक लाख एक हजार २४२ युनिटची वीजचोरी केली.
याप्रकरणी धर्मराज संपतराव काकडे, मोहम्मद सद्दाम शेख, अमीर रज्जाक (सर्व रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद कार्यकारी अभियंता प्रदीप राधेशाम सावंत यांनी दिली.
धर्मनाथ काकडे यांचे लोणीव्यंकनाथ गावात व्यापारी संकुल आहे. काकडे यांनी सर्व गाळे भाड्याने दिले आहेत. गाळेधारकांनी विजेची चोरी केल्याचा ठपका महावितरण कंपनीने तिघांवर ठेवला आहे.