अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यात नवलेवाडी येथे शासकीय रेशनिंग तांदळाच्या गोण्यांची आदलाबदली करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजूर येथील दत्ता सुदामराव चोथवे व चालक खंडु काशिनाथ भारमल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पत्र्याच्या खोलीत खाकी रंगाचे बारदानातील ७५ गोणी तांदूळ ,
तसेच सफेद रंगाचे बारदान असलॆली १०७ गोणी तांदूळ व महाराष्ट्र शासन नाव आसलेल्या ४५८ व सफेद रंगाचे २२६ अशा एकुण ६८४ रिकाम्या गोण्या व आयशर टेम्पोसह एकुण ९ लाख ८० हजार ७८ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या कार्यकर्त्यांना रेशनिंगचे धान्य नवलेवाडी येथे खाली होत असल्याची माहिती मिळाली.
नवलेवाडी येथील प्रमोद भिकाजी नवले यांच्या पत्र्याच्या खोलीत एका टेम्पोमध्ये रेशनिंगचा तांदूळ असल्याचे समजले. काही कार्यकर्त्यांनी गाडी व माल पकडून महसूल व पोलिस यंत्रणेला माहिती दिली.
सकाळी याबाबत महसूल विभागाने पंचनामा करुन वाहनासह मुद्देमाल जप्त करत रात्री उशिरा अकोले पोलिस ठाण्यात निरीक्षक सतिषकुमार थारकर यांनी फिर्याद देवून गुन्हा दाखल करण्यात आला.