धान्याच्या कोठीत कोंबलेला मृतदेह सापडला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- धान्याच्या पत्र्याच्या कोठीत कोंबलेला ३५ ते ४० वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह कुकडी नदीपात्रात दुपारी चारच्या सुमारास आढळला. सुरुवातीला मृतदेह महिलेचा असल्याची चर्चा होती.

मात्र, नदीपात्रातून कोठी बाहेर काढल्यानंतर पुरुषाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. कुकडी नदीपात्रातील जगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) परिसरात,

निघोज टाकळीहाजी रस्त्यावरील जुन्या पुलाजवळ धान्याची कोठी असल्याचे परिसरातील तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी स्थानिक पुढाऱ्यांना माहिती दिल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास पोलिसांना कळवण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कोठीमध्ये मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती.

तशाही स्थितीत पोलिसांनी कोठी नदीपात्राबाहेर काढली. मृतदेह ३५ ते ४० वर्षांच्या पुरुषाचा असल्याचे आढळले. ओळख पटवण्यासाठी

त्याची छायाचित्रे विविध पोलिस ठाण्यांकडे पाठवण्यात आली आहेत. अनेक दिवस पाण्यामध्ये असल्याने जलचरांनी मृतदेहाचे चावे घेतले आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24