अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- मंगळवार दि. 15 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे प्रेमप्रकरणातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती.
यात गोळीबार करणारा सदर तरुण (विक्रम उर्फ विकी रमेश मुसमाडे) हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा मृत्यू झाला. परंतु या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांनी आपल्या व्हॉट्स अॅप स्टेटसवर त्या तरुणीसोबत विक्रमचे असलेले फोटो व्हायरल केले
आहेत. हे घडलेले प्रकरण एकतर्फी प्रेमातून झलेले नसून असा दावा केला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती अशी की, सदर तरुणाने मंगळवारी पहाटे प्रेम असलेल्या तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर व स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
यात ती तरुणी किरकोळ तर विक्रम मुसमाडे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करत असताना विक्रम मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved