Maruti Car Price : मारुती ही देशातील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या वाहनांची ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रियता आहे. या कंपनीच्या अनेक कार ग्राहकांना अक्षरशः भुरळ घालत आहेत. अनेकांचे मारुतीचे कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे. दरम्यान, मारुतीची कार खरेदी करणाऱ्यांना आता स्वस्तात कंपनीची एक लोकप्रिय कार खरेदी करता येणार आहे.
जर तुम्हीही मारुतीची कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मारुती कंपनीच्या एका लोकप्रिय हॅचबॅक कारवर तब्बल 44 हजार रुपयांचा डिस्काउंट कंपनीच्या माध्यमातून दिला जात आहे. यामुळे ग्राहकांना स्वस्तात कार खरेदी करता येणार आहे. जर तुम्हीही नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मारुतीची ही कार तुम्हाला स्वस्तात विकत घेता येणार आहे.
कोणत्या कारवर मिळतोय 44 हजाराचा डिस्काउंट
मीडिया रिपोर्टनुसार, मारुती कंपनीच्या लोकप्रिय बलेनो या कार वर कंपनीच्या माध्यमातून तब्बल 44,000 पर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. खरे तर कंपनीची ही लोकप्रिय कार चार वेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. दरम्यान, या गाडीच्या मॉडेल इयर नुसार कंपनीच्या माध्यमातून 29 हजारापासून ते 44000 पर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये 2023 च्या मॉडेलवर 44 हजाराचा डिस्काउंट मिळत आहे तर 2024 च्या मॉडेलवर 29 हजारापर्यंतचा डिस्काउंट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या माध्यमातून 2023 च्या मॉडेलवर 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, पंधरा हजार रुपयाचा एक्सचेंज बोनस आणि चार हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस असा एकूण 44 हजार रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध करून दिला जात आहे.
तसेच जर कंपनीच्या 2024 च्या मॉडेल बाबत बोलायचं झालं तर या मॉडेलसाठी कंपनीच्या माध्यमातून दहा हजार रुपयाचा कॅश डिस्काउंट, पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस असा एकूण 29 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ही गाडी सध्या 6.41 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे.