अहमदनगर बातम्या

अहमदनगर दौंड रस्त्यावर अपघातात डॉक्टरांचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर दौंड रोडवरील बाबुर्डी बेंद शिवारात सोमवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी भीषण अपघातात मोटार पारगाव सुद्रिक येथील डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. संजय तुकाराम काळे (वय ४९) असे मृताचे नाव आहे.

त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्व. संजय काळे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. इंजिनिअर राजेंद्र काळे यांचे ते बंधू, तर गोपाळराव डांगे यांचे मेव्हणे होत.

डॉ. काळे हे सोमवारी अक्षय ठोमसे व वरद संतोष पवार यांच्यासोबत नगरला जात होते. बाबूर्डी येथे त्यांच्या मोटारीला अपघात झाला. त्यात अक्षय ठोमसे व वरद पवार या मावसभावांचा जागीच मृत्यू झाला,

तर डॉ. संजय काळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नगरमधील दवाखान्यात उपचार सुरू होते. डॉ. काळे यांच्यासाठी श्रीगोंदे तालुका सायकल असोसिएशनच्या सदस्यांनी साळवण देवीला सामुदायिक प्रार्थना करून साकडे घातले.

मात्र, बुधवारी सकाळी डॉ. काळे यांचे निधन झाले. श्रीगोंदे तालुक्यात सायकल चळवळ निर्माण डॉ. संजय काळे यांचे मोठे योगदान होते. त्यांच्यावर पारगाव सुद्रिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office