शेळ्या चारण्यासाठी गेलेला शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  शेळ्या चारण्यासाठी गेलेला शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास जामगाव शिवारात ही घटना घडली.

केरू मोहन घावटे (४०) हे सकाळी शेळ्या घेऊन गोरेगाव शिवारातील ढवळदरा परिसरात गेले होते. कळप पाणी पिऊन आल्यानंतर एक शेळी आली नाही,

म्हणून घावटे यांनी जवळच्या झुडपात दगड मारला, परंतू झुडपातून शेळी बाहेर येण्याऐवजी बिबट्याने बाहेर येत घावटे यांच्यावर झडप घातली.

त्यांच्या उजव्या हातास, तसेच गालास जखम झाली. घावटे यांनी बिबट्यास ढकूलून दिले, पण अधिकच चवताळलेल्या बिबट्याने पुन्हा हल्ला करत त्यांच्या डाव्या हातास चावा घेतला.

हा थरार सुरू असताना भावाने तो पाहिला. तो मदतीला धावून आला. दोघांनी मिळून बिबटयास पिटाळून लावले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24