अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-कचरा टाकण्याच्या कारणातून झालेल्या वादात एकानं दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तोफखाना परिसरात सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडलीया जीवघेण्या हल्ल्यात महेमुद अब्दुलगनी शेख यांच्यासह सैफ महेमुद शेख, इर्शाद शेख जखमी झाले आहेत.
दरम्यान फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार हल्ला करणारे फैयाज अब्दुल कादर शेख व त्याची पत्नी अमरीन फैयाज शेख (दोघे रा. तोफखाना) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात महेमुद अब्दुलगनी शेख यांच्यासह सैफ महेमुद शेख, इर्शाद शेख जखमी झाले आहे. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.