नगर शहरात बेशिस्त नागरिकांना तीन दिवसांत दीड लाखाचा दंड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

यासाठी नगरमध्ये अनेक नियम बनविण्यात आले आहेत. परंतु अनेक लोक बेफिकिरीने वागताना दिसतात. यासाठी मास्क न वापरणारे, तसेच नियमबाह्य दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांत मनपाच्या पथकांनी सुमारे दीड लाखाचा दंड बेशिस्त नागरिकांकडून वसूल केला आहे.

शहरात कोरोनाची गंभीर स्थिती असताना अनेकजण रस्त्यांवर गर्दी करत आहेत. तोंडाला मास्क न बांधता काहीजण बिनधास्त फिरत आहेत.

महापालिकेच्या व्हिजलन्स स्काॅडने तीन दिवसांत तब्बल १ लाख ४२ हजारांचा दंड वसूल केला. इतर पथकांकडूनही कारवाई सुरूच आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24