Ahmednagar News | पुणे – नगर महामार्गावर धावत्या बसला लागली आग, चालकाच्या प्रसंगवधानांमुळे वाचले प्राण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर तालुक्यातील पुणे, नगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात खासगी ट्रॅव्हल बसला आग लागल्याने बस जळून खाक झाली. या वेळी चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील सर्व ३० प्रवासी बचावले.

ही घटना शनिवार, दि.२५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, शनिवार, दि.२५ मार्च रोजी जळगाव ते पुणे ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने होती. बस नारायणगव्हाण शिवारात आली असता, गाडीमध्ये शॉट सर्किटमुळे आग लागल्याचे चालक विलास गुलाब जुमडे रा.खामगाव यांच्या लक्षात आले,

या वेळी चालकाने ताबडतोब बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना तत्काळ खाली उतरण्याच्या सूचना करताच क्षणाचाही विलंब न लावता प्रवासी सुखरूप बसच्याखाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. काही वेळाने प्रवाशांना पुणे येथे पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी बचावले. यामुळे सर्व प्रवाशांनी चालकास धन्यवाद दिले. बसचो आग आटोक्यात आणण्याकामी रांजणगाव एमआयडीसी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

घटनेची माहीती समजताच सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या सुचनेनुसार सुपा पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जळीत बस क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक आली.