नगर अर्बन बँकेला आगीची झळ, या गावात घडली घटना

Ahmednagar News:विविध कारणांमुळे सतत चर्चेत असलेल्या नगर अर्बन बँकेच्या काष्टी शाखेला रात्री आगीच झळ बसली. काष्टीत अर्बन बँकेची शाखा असलेल्या एका इमारतीतील दुकानाला आग लागली.

ती पसरत बँकेच्या शाखेपर्यंत आली. पहाटे आग अटोक्यात आणण्यात यश आले असून यात नेमके किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही.श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर अर्बन बँकेची शाखा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्या इमारतीत अन्य दुकानेही आहेत. त्यातील एका दुकानाला रविवारी रात्री आग लागली. आगीची झळ शेजारीच असलेल्या बँकेच्या शाखेलाही बसली. आगीची माहिती मिळतात. नागरिक आणि अग्निशामक दलाच्या पथकाने धाव घेतली.

आग अटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास आग अटोक्यात आली. बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी तेथे पोहचले असून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

बँकेचा हॉल्ट, कपाटातील कर्ज अर्ज, खाते अर्ज, लॉकर, सोनेतारण बॅग्स सर्व काही व्यवस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे. नेमके काय आणि किती नुकसान झाले, याची माहिती घेण्यात येत आहे.