Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला आगीच्या घटना नवीन नसल्या तरी अलीकडील काही दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. नगर शहरातील असोत की नुकतेच पारनेरमध्ये घडलेली भीषण आगीची घटना असो य घटना दुर्दैवीच असतात.
आता थेट महावितरणच्या पॉवर हाउसमध्येच आग लागल्याची घटना घडली. महावितरण कंपनीच्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाउसमध्ये ही आग लागली. आगीची घटना शनिवारी (दि.०६) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाद्वारे पाणी मारून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पॉवर हाउसमध्ये संरक्षण भितींना खेटून अनेक झाडे आहेत. परिसरात स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, कचरा साचतो. एका झाडाखाली साचलेल्या पालापाचोळ्याचा आग लागून ती मोठ्या प्रमाणात इतरही ठिकाणी पसरून झाडांपर्यंत पोहोचली.
आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठत असल्याने, परिसरातील नागरिकांनी संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी संपर्क केला. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला याबाबत कल्पना दिली.
काही वेळातच नगरपरिषदेचे कर्मचारी अग्निशमन दलाचा बंब घेऊन पॉवर हाउसमध्ये पोहोचले. पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. दोनदा अग्निशमन बंब बोलावून आग शमविण्यात आली.
वेळेत वाहने हटवली, अन्यथा…
महावितरण कंपनीच्या पॉवर हाउसमध्ये मोकळी जागा असल्याने तेथे अनेक उचकी पार्किंग केल्या जातात. आग लागली, तेव्हा परिसरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे वाहन तेथे उभे होते.
त्या संदर्भान अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी ते वाहन तेथून बाजूला केले. तेथे इतर दुचाकी-चारचाकी वाहने उभी असली, तर मोठा अनर्थ घडला असता, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.