अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणपती विक्रीचे काही स्टॉल मेनरोड, शिवाजी रोड व अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करून लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.
मेनरोड, शिवाजी रोडवर गर्दी होईल, म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सर्व स्टॉल थत्ते मैदानावर लावण्यात आले. तथापि,
मूर्ती सोडून इतर साहित्य विकणाऱ्या अनेकांनी मेनरोडवरच दुकाने थाटल्याने मोठी गर्दी होऊन नगरपालिका व पोलिस प्रशासनाच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला.
शांतता कमिटीच्या बैठकीत स्टॉलच्या जागेबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. नगराध्यक्षांनी बैठक घेऊन मेनरोड, शिवाजीरोड व अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून गाळे देण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, कोरोनाचा लक्षात घेता मेनरोडवर स्टॉल लावले, तर गर्दी होईल. त्यामुळे सर्व स्टॉल थत्ते मैदानावरच लावा, अशी सूचना पोलिसांनी केली होती. मात्र, या निर्णयाला अनेक विक्रेत्यांनी हरताळ फासला.
गणेशोत्सवासाठी लागणारे पूजा साहित्य व इतर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी आपली दुकाने मेनरोडवरच थाटली. त्यामुळे गर्दी झालीच.
बेशिस्त नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपली वाहने आडवी-तिडवी उभी केली होती. अनेक विक्रेते व ग्राहकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचे, तर तीन तेरा वाजले होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved