पारनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ! २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ४ चोरट्यांनी दोघांना मारहाण करत २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली.

या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर अण्णा गागरे यांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाकर अण्णा गागरे व त्यांची पत्नी सौ. विमल प्रभाकर गागरे हे दोघे जखमी झाले आहेत. चोरट्यांनी गागरे यांच्या घराच्या पडवीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली.

फिर्यादी व त्यांची पत्नी यांना लोखंडी सळईने मारहाण करुन सोन्या- चांदीचे दागिने बळजबरीने काढून घेतले. सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

चोरट्यांनी गागरे कुटूंबियांना मारहाण करत त्यांना किचन रुममध्ये कोंडून तेथून पोबारा केला. शुक्रवारी (दि. १७) ही घटना घडली. या प्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी संपत भोसले तसेच पोनि ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास पोनि. गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. ठाकूर हे करत आहेत.