स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-  स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटणार्‍या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पांड्या उर्फ पांडुरंग भोसले असे त्याचे नाव आहे. त्याला कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक येथील दिनेश दगडू पाटील यांना 10 लाख रुपयांत एक किलो सोने देण्याच्या आमिषाने आरोपी भगीरथ भोसले, हिरू भोसले (दोघे रा.पढेगाव) यांनी 7 जुलै, 2019 रोजी मावळगाव (कोपरगाव) शिवारात बोलावून घेतले.

तेथे मारहाण करून त्यांच्याकडील 10 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले होते. त्यातील आरोपी पांड्या भोसले पढेगाव येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24