एका माथेफिरुमुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात; त्याचा बंदोबस्त करा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- पाथर्डीत शहरात गेल्या दीड वर्षापासून विविध भागामध्ये एक अनोळखी माथेफिरू सातत्याने रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कुठल्याही भागातील महिलेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून घरात घुसून किंवा खिडकीतून डोकावत छेडछाड करण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत.

असाच प्रकार शहरातील जय भवानी चौक, जुनी पोलिसलाइन या भागांमध्ये घडून मोठी दहशत निर्माण झाली. या प्रकारचा त्वरित बंदोबस्त पोलिसांनी करावा, अशी मागणी शहरातील महिलांनी पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.

या महिलांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व नगरसेविका दीपाली बंग यांनी केले. यावेळी बंग म्हणाल्या, येत्या पंधरा दिवसांत संबधित माथेफिरू मनोरुगणाचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.

महिला अथवा मुली घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. शहरामध्ये पोलिसांची गस्त पूर्वीप्रमाणे होत नाही. वाहतुकीला अडथळे वाढल्याने भाजी बाजारासह बाजारपेठेमध्ये महिलांना जीव मुठीत धरून वावरावे लागते, असे बंग म्हणाल्या. पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24