हृदय पिळवटून टाकणारी घटना ! भीषण अपघातात दोन भावंडांचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर रोडवरील माळी बाभूळगावच्या पुढे असणाऱ्या मानमोडी पुलाजवळ कार व दुचाकीच्या झालेल्या झालेल्या अपघातात दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

संदीप एकनाथ बडे (वय २४) व गणेश भानुदास बडे (वय १६) (रा. येळी ता. पाथर्डी) असे मृत झालेल्या दोन सख्या चुलत भावांची नावे आहेत. नगरवरून पाथर्डीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार तर दुचाकीस्वार संदीप बडे व गणेश बडे हे येळी गावची यात्रा करून पाथर्डीतून नगरला जात असताना

सोमवारी रात्री कल्याण – निर्मल (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील मानमोडी पुला जवळ हा अपघात झाला. कार आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार संदीप बडे व गणेश बडे या दोघा युवकांना जबर मार लागून गंभीर जखमी झाले होते.

या युवकांना नगर या ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले. यातील संदीप एकनाथ बडे याचा उपचार दरम्यान सोमवारी तर गणेश बडे याचा दुसऱ्या दिवशी मंगळवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe