अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिक परिस्थिती खालावलेली असलेल्यांसाठी, तसेच महागडे उपचार परवडत नसल्याने सर्वांसाठी मोफत रुग्णसेवा करणारे महापालिकेचे कै. बाळासाहेब देशपांडे हे एकमेव हॉस्पिटल नगर शहरात आहेत. आर्थिक स्थिती बिकट असलेले अनेक पेशंट याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.
मात्र तेथील इमारत मोडकळीस आली असून जीव मुठीत धरून तेथे रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान महापालिकेच्या अधिपत्याखाली असलेले कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलची इमारत नव्याने बांधण्यासोबतच सावेडीत नव्याने हॉस्पिटल उभारणीचा विचार महापालिकास्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
महापालिका प्रशासनाने यासाठी 5 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे निधी मागितला आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांचा त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान मोफत रुग्णसेवा करणारे महापालिकेचे कै. बाळासाहेब देशपांडे हे एकमेव हॉस्पिटल आहेत.
आर्थिक स्थिती बिकट असलेले अनेक पेशंट याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मात्र तेथील इमारत मोडकळीस आली असून जीव मुठीत धरून तेथे रुग्णावर उपचार सुरू आहेत. कै.देशपांडे रुग्णालयाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून ते दुरुस्त करावे, अथवा त्याच ठिकाणी नवीन रुग्णालये बांधावे हा विषय प्रलंबित आहे.
हाच विषय मार्गी लावण्यासाठी तत्कालीन महापौर सुरेखा कदम यांनी देखील राज्यसरकारकडे विशेष निधीची मागणी केलेली आहे. त्या सभेमध्ये नव्याने देशपांडे रुग्णालयात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खा. डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यासदंर्भात प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार करत नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत पाच कोटी रूपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. या निधीतून देशपांडे रूग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यासोबतच सावेडीसाठी स्वतंत्र नवे हॉस्पिटल उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेचा विचार त्यासाठी सुरू असल्याचे समजते.