शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी मंगळवारी करणार जेलभरो आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर शेतकर्‍यांनी 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत शहरात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी राजेंद्र करंदीकर, डॉ. भास्कर रणनवरे, बाळासाहेब पातारे, सुभाष गायकवाड, सुरेश गायकवाड, संपत पवार, सुधाकर पातारे, मुक्ती अल्ताफ,जैद शेख, अशोक साळवे, श्याम काते, इमरान सय्यद, शिवाजी भोसले, अशोक साळवे, मनोहर वाघ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

घेण्यात आलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विविध राज्यातून आलेल्या शेतकर्‍यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने संपुर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पाश्‍वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलनास सक्रीय पाठिंबा देण्यात आला असून,

मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दुपारी 3 वाजता कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधात मंजूर केलेले तीन काळे कायदे त्वरीत मागे घेण्यात यावे,

शेतकर्‍यांच्या मुलाला योग्य हमी भाव मिळावा व शेतकर्‍यांकडून अल्प दरात माल खरेदी करुन जास्त भावाने विक्री करणार्‍या दलालांवर कारवाई होण्यासाठी लोकसभेत नवीन कायदा पारीत करावा, निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24