अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे. यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे.
दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिर्डी शहरात महाराष्ट्र शासनाच्या पोलीस वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 26 कोटी रुपये खर्च करून ऑफिस व पोलीस निवासस्थान अशा जवळपास 7 मजली इमारतीचे काम सुरु आहे.
या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून काम सुरु असताना एक बिगारी काम करणारा व्यक्ती शामलाल धरमलाल बिजेवार (वय ४२, रा. बालाघाट, मध्यप्रदेश) यांचा काम करताना पडुन जबर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
या बिल्डिंग कामाकरीता अविकसीत राज्यातील गरिब मजूर आणण्यात आले आहे. मयत बिजेवार मित्रांसह कामावर येथे काम करत होता.
गरिब कुटुंबातील तरुणांचे बांधकाम करताना मृत्यू झाल्याने कामगार वर्गाच्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.