येत आहे ‘खरेदिवाला’नावाचे मराठमोळे स्टार्टअप; फ्रांचाईसीसाठी संपर्क करण्याचे प्रवर्तकांचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- बहुराष्ट्रीय कंपन्या आणि काही देशी भांडवलदार यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग बिजनेसमध्ये आता आणखी एक नवे नाव जोडले जाणार आहे. होय, हे नाव अजिबात इंग्रजी नाही.

आपल्या मातीत रुजलेले आणि मराठमोळ्या स्वदेशी तरुणांचे हे स्टार्टअप आहे. त्याचे नाव आहे ‘खरेदिवाला’. नावातूनच खरेदीदारांच्या हितासाठी प्राधान्य देण्याचा उद्देश या स्टार्टअपचा असल्याचे स्पष्ट दिसते. याबाबत माहिती देताना या कल्पनेला सत्यात साकारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संचालक सचिन चोभे यांनी सांगितले की,

स्टार प्रो फर्मच्या तरुणांच्या फर्मची ही संकल्पना आहे. संपूर्ण मराठी मातीत रुजलेले हे पहिलेवहिले असे ई कॉमर्स स्टार्टअप असेल. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. तसेच याद्वारे काहींना पैसे कामाविण्याचीही संधी असेल. विशेष म्हणजे सर्वात कमी किमतीत खरेदीचा हा एक विश्वासार्ह पर्याय असेल.

यामध्ये उत्पादनांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत असेल. याबाबत माहिती देताना संचालक महादेव गवळी यांनी सांगितले की, www.kharediwala.com हे एक असे स्टार्टअप आहे जिथे शेअर आणि रेफर करण्यासाठीची एक खास यंत्रणा निर्माण केली आहे.

प्रत्येक पोस्टल पिनकोडसाठी एक यानुसार एक ‘खरेदिवाला सीएससी’ देण्यात येणार आहे. त्यांना याद्वारे फ़क़्त मोबाईलच्या मदतीने पैसे कमावता येतील. आम्ही या पोर्टलवर मोबाईल, अक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सर्व प्रकारचे कपडे, डिजिटल गॅजेट्स, कार सजावटीच्या वस्तू, फार्मिंग टूल्स, होम केअर आणि ब्युटी केअर यांच्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत.

कोणालाही यामध्ये आपल्या वस्तू विक्री करण्याची इच्छा असल्यास त्यांनीही या 07770012020 मोबाईल किंवा kharediwala.india@gmail.com या इमेलवर संपर्क करावा.

फ्रांचाईसी घेण्यासाठी आणि कामकाज याबाबत सूचना, नियम व अटी :

१. एका पोस्टल पिन कोडसाठी एक ‘खरेदिवाला सीएससी’ यांना नियुक्त केलेले आहे. त्याच पिन कोडसाठी दुसरी सीएससी मिळणार नाही. प्रथम करार करणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. आपली ‘खरेदिवाला सीएससी’ ही गावातील किंवा शहरातील गजबजलेल्या भागात आणि मुख्य रस्त्यावर असावी.

२. www.kharediwala.com यावर असलेल्या उत्पादन, सेवा आणि वस्तू यांचीच विक्री फ़क़्त ‘खरेदिवाला सीएससी’ यामधून करण्यात यावी.

३. आपला दुसरा कोणताही इतर व्यवसाय असल्यास त्याबाबत अगोदरच माहिती द्यावी. तसेच दोन्हींमध्ये कोणत्याही स्वरुपात संबंध न ठेवता ग्राहकांशी व्यवहार करण्याची खबरदारी घ्यावी.

४. वेबसाईटवर दिसणारी आणि उपलब्ध असलेली उत्पादनेच आपण ‘खरेदिवाला सीएससी’ यांच्या नावाने आपल्या भागात ऑर्डरसाठी नोंदणी करवून घेऊ शकता. जी उत्पादने आउट ऑफ सेल दिसत असतील त्याच्या विक्रीसाठीचे नियोजन किंवा आश्वासन देऊ नये.

५. एका पोस्टल पिन कोडसाठी एक ‘खरेदिवाला सीएससी’ यांना नियुक्त केलेले आहे. त्याच पिन कोडसाठी दुसरी सीएससी मिळणार नाही. त्यामुळे आपल्या पोस्टल पिन कोड यावरील सर्व ऑर्डर आपण घेतलेल्या, थेट ऑनलाईन आलेल्या अशा सर्वांसाठीचे कमिशन (4 ते 10 टक्के, उत्पादनानुसार त्यामध्ये बदल असेल) देण्यात येईल.

६. त्यासाठी ‘स्टार प्रो’ यांच्याकडून आलेल्या सूचना आणि नियम ‘खरेदिवाला सीएससी’ यांच्यासाठी सर्वांना बंधनकारक असतील.

७. ‘स्टार प्रो’ व्यवस्थापन टीम यांच्याकडून आलेली माहिती, लेख, प्रोडक्ट इमेजेस, वेबसाईट लिंक आणि इतर माहिती आपण सोशल मिडियावर शेअर करावी.

८. प्रत्येक महिन्याला उत्पादन व सेवा यांच्या विक्रीतून पिन कोडनिहाय मिळणारे कमिशन आणि शेअरेबल रेव्हेन्यू आपल्या बँक खात्यात प्रत्येक महिन्यास १५ ते २० या तारखेच्या दरम्यान जमा होईल.

९. आपणास शेअरेबल रेव्हेन्यू आणि उत्पादन / सेवा यांच्या विक्रीतून पैसे मिळतील. याशिवाय कोणत्याही स्वरुपात आपणास ‘स्टार प्रो’ कंपनी यांच्याकडून इतर पैसे मिळणार नाहीत. तसेच आपणही अनामत रक्कम परतावा असलेली 10 हजार रुपये आणि विनापरतावा असलेली 5 हजार रुपये याशिवाय कोणत्याही स्वरुपात रक्कम देऊ नये.

‘खरेदिवाला सीएससी’ फ्रांचाईसी गुंतवणूक आणि परतावा याचे विवरण

गुंतवणूक :

१. अनामत रक्कम 15,000 रुपये (5 हजार विना परतावा आणि 10 हजार रुपये परतावा असलेली.

२. जागा भाडे आणि इतर खर्च (मासिक खर्च)

परतावा स्वरूप (मासिक) :

१. उत्पादन विक्री यामधून 4 ते 10 टक्के कमिशन

२. शेअरेबल रेव्हेन्यू संदर्भ : प्रेसनोट

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24