अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील सभेत आ. रोहित पवार यांना मंत्री करण्याचे शरद पवार यांचे सुतोवाच! भाजपा आमदार राम शिंदेंवर केली ‘ही’ टीका

Published by
Ajay Patil

Ahmednagar News: राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून प्रत्येक पक्षाकडून या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयारी केली जात आहे व आवश्यक मोर्चेबांधणी देखील केली जात आहे. याच विधानसभेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे व सध्या ही यात्रा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे.

याप्रसंगी  अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व या सभेला संबोधित करत असताना खा. शरद पवार यांनी आ. रोहित पवार यांना मंत्री करण्याचे सुतवाच केले असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी भाजपा आमदार राम शिंदे यांच्यावर देखील सडकून टीका केली.

 शरद पवार यांचे आमदार रोहित पवार यांना मंत्री करण्याचे सुतोवाच

कर्जत जामखेड मतदार संघातील जनतेची आमदार रोहित पवार यांनी पाच वर्षे  सेवा केली असून, पुढची पाच वर्षे तुमच्यासह महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा शब्द देत खा. शरद पवार यांनी एकप्रकारे आ. रोहित पवार यांना मंत्री करण्याचे सूतोवाच केले आहे.

यांनी खर्डा आयोजित सभेत खा. पवार बोलत होते. या वेळी होळकर यांची वंशज भूषण सिंहराजे होळकर, खा. नीलेश लंके, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार राहुल मोटे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे,

पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी सभापती सुधीर राळेभात पाटील, माजी सभापती सुर्यकांत मोरे, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, पक्षाचे जेष्ठ नेते सुरेश भोसले, शिवसेना (उबाठा) गटाचे तालुकाप्रमुख गणेश उगले, वैजिनाथ पोले, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे पाटील, सरपंच बापुसाहेब कार्ले, संचालक बाळासाहेब साळुंके, आदी उपस्थित होते.

या वेळी खा. पवार म्हणाले की, विकासकामे करायला अक्कल लागते, पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही, रोहित पवार चांगले काम करत असून, त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका, असे म्हणत पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली.

खा. लंके म्हणाले की, आ. रोहित पवार यांनी विकास कामांचा बॅकलॉक भरून काढला आहे, असे अभ्यासू व नियोजनपूर्वक काम करणाऱ्या नेत्यास राज्याचा नेता म्हणून पाठविण्याची आपली जबाबदारी आहे.आ. रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी मला कर्ज जामखेड मतदारसंघात लढण्याचे सांगितले, मला जनतेने निवडून दिले असून, मी आजपर्यंत जनतेचा सेवक म्हणून काम करीत आहे.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी केले. दत्तात्रेय वारे, भूषणसिंह होळकर यांची या वेळी भाषणे झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Ajay Patil