Ahmednagar News : फसवणुकीचा नवा फंडा ! खासगी बचतगट, लकी ड्रॉ, बक्षिसाचे आमिष दाखवत महिलांना लाखो रुपयांचा गंडा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या समाजात अनके नवनवे फसवणुकीचे फंडे तयार झाले आहेत. सायबर क्राईम असेल, किंवा विविध फसव्या योजना असतील त्याद्वारे फसवणूक केली जात आहे. आता फसवणुकीचा नवीनच फंडा समोर आला आहे.

खासगी महिला बचतगटाच्या नावाखाली गावागावात जाऊन एखादे लकी ड्रॉ चे कार्ड द्यायचे. यात स्क्रॅच केल्यानंतर पैसे किंवा वस्तू लागतील असे सांगितले जाते, त्यानंतर ही सोडत कधी होईल तेही सांगितले जाते. यासाठी प्रत्येकी शंभर ते दोनशे रुपये घेतले जातात,

मात्र सोडत होत नाही आणि वस्तूही दिली जात नाही. असे प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुरू आहेत.

खासगी बचतगटातील पाच-सहा महिला शहरात घरोघरी जाऊन महिलांना योजना पटवून देतात. ‘बक्षीस लागल्यावर 2700 रुपये भरून बक्षीस नेऊ शकता. सहा महिन्यांत तुम्हाला वस्तू मिळाली नाही, तर आमच्याकडून दोनशे रुपये किमतीचे फ्री गिफ्ट मिळेल,’ असे सांगितले जाते.

नंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या निदर्शनास येते. पैसे नेल्यावर या महिला पुन्हा फिरकत नाहीत. फसवणूक झालेल्या महिला आपल्या घरात वाच्यता करीत नसल्याने भामट्यांचे चांगलेच फावते. लाखोंचा गंडा घालणारे हे मोठे रॅकेट असल्याची चर्चा आहे. आठ दिवसांपूर्वी पारनेरसह सुपे, निघोज, भाळवणी या भागात वरीलप्रकारे महिलांची फसवणूक झाली.

वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये जाऊन पाच ते सात महिला माहिती सांगत असताना काही नागरिकांनी त्यांना ओळखपत्राबाबत विचारले, तसेच योजनेच्या प्रमुखांना फोन लावण्याची मागणी केली. फोन लावल्यावर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत काही वेळातच फोन बंद करण्यात आला. त्या महिलाही काही वेळात पसार झाल्या.

पोलीस धागेदोरे लावलीत का?

तालुक्यातील सुपे येथे मोठो औद्योगिक वसाहत असल्याने येथे विविध कंपन्यांमध्ये 15 ते 16 राज्यांतील महिला काम कामासाठी आहेत. यातील काही महिला फसवणूक करत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशी फसवणूक करणाऱ्यांचे पोलीस धागेदोरे लावून गरीब महिलांना न्याय मिळेल का असे प्रश्न महिला करत आहेत.

आमिषाला न भुलण्याचे आवाहन

आमच्याकडे अनेक वस्तू आहेत. तुम्ही शंभर किंवा दोनशे रुपये दिल्यावर तुम्हाला कार्ड व बक्षीस मिळेल.’ या आमिषाला भुलून पाच-सहा वर्षांपूर्वी अनेक महिलांनी रकमा दिल्या होत्या. मात्र, आजतागायत एकही वस्तू मिळाली नाही. त असेच काहीसे प्रकार घडत आहेत. अशा आमिषाला महिलांनी भुलू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe