Ahmednagar News : अहमदनगर राजकीय पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र असलेल्या निविष्ठावरील चित्र न झाकता शेतकऱ्यांना विक्री केल्यास कृषी कें द्रचालकांवर कारवाईचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिला आहे.
या आदेशामुळे राजकीय नेत्यांचे छायाचित्रे असलेल्या शेकडो टन खताच्या गोण्यांवरील चित्र रंगवण्याचा अतिरिक्त खर्च मात्र विक्रेत्यांनाच सोसावा लागणार आहे. जर हा खर्च टाळून या चित्रासह खत विक्री केल्यास आचारसंहिता भंगाची धास्ती आहे.
जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यानंतर खतांना मागणी वाढते, परंतु, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांकडून मार्च ते एप्रिल महिन्यात खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खताच्या काही गोण्यांवर पंतप्रधानांचे छायाचित्र आहे.
जिल्ह्यात आज अखेर १ लाख २८ हजार ४७५ मे. टन खतसाठा आहे. त्यापैकी किरकोळ विक्रेत्यांकडे ८२ हजार ६०२ मे. टनखतशिल्लक आहे. खतांच्या गोण्यामागे पाच ते १० रूपयांपेक्षा जास्त फायदा नाही. अशातच परत चित्र झाकण्यासाठीचे आदेश दिले.
जर हे चित्र झाकायचे होते तर छापलेच कशासाठी आता रंग आणि ब्रश तयार ठेवण्याच्या सुचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. विक्री करताना रंग दिला तरी तो लगेच वाळणा नाही. त्यामुळे तोपुसून चित्र दिसेल.
अशी शंका फर्टीलायझर असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष सतीश मुनोत यांनी व्यक्त केली.