शहरातील या परिसरात लवकरच सुरु होणार पोलीस चौकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असताना त्याचबरोबरीने शहरातील वाढती गुन्हेगारीला आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

तसेच शहरातील बोल्हेगाव-नागापूर परिसराची लोकवस्ती वाढल्याने या परिसरात गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढत्या चोऱ्या, लुटमारी, दरोडा या घटनांना वचक बसावा म्हणून बोल्हेगाव परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरुपात पोलिस चौकीला मान्यता मिळाली आहे.

जागेची पाहणी करून ती लवकरात लवकर सुरू होईल असे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सांगितले. पोलिस चौकीसाठी जागा निश्‍चित करून लवकरच तात्पुरत्या स्वरुपातील पोलिस चौकी सुरू होणार असल्याचे

त्यांनी सांगितले. दिवाळीचा सण जवळ आला असून पुढील दिवसात होणारा धोका टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्या टुकार मुलांकडून मुली व महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी लवकरात लवकर उपाय योजना कराव्या, अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, परिसरातील नागरिक व पेन्शनर ग्रुप बोल्हेगाव-नागापूर यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24