अहमदनगर बातम्या

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींची तिरडी बांधण्याचा कार्यक्रम

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी येथे मराठा आरक्षण आंदोलाचा काल गुरुवारी चौथा दिवस असून वांबोरी, कात्रड, गुंजाळे, कुक्कडवेढे येथील ग्रामस्थांच्या वतीने बाजार पेठ बंद ठेवत सहभाग नोंदवला.

या आंदोलना दरम्यान राहुरी येथे मराठा आरक्षण साखळी उपोषणा दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींची तिरडी बांधण्याचा कार्यक्रम वाजत गाजत साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मराठा बहुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे सदस्य देवेंद्र लांबे यांनी सांगितले की, गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजाला फसविण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून किंवा मराठा आरक्षण आंदोलनात विघ्न आणत आहेत, अशा प्रवृत्तींची तिरडी काल गुरूवारी सजवली होती. मराठा आरक्षणाला विरोध करण्याचे तात्काळ थांबवावे,

अन्यथा आज तिरडी सजवली आहे. भविष्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाच तर सजवलेल्या तिरड्या मराठा समाजाला पेटवायला वेळ लागणार नाही, याची नोंद घ्यावी, अशी माहिती लांबे यांनी दिली.

प्रतिमात्मक तिरडी आंदोलन करण्यासाठी विनायक बाठे, मधुकर घाडगे, ज्ञानेश्वर सप्रे, रवींद्र तनपुरे, महेंद्र शेळके, बंटी पटारे आदींनी सहभाग नोंदवला. काल गुरवारी राहुरी येथील साखळी उपोषणास चर्मकार विकास संघ आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.

सोमवार (दि. ३०) ऑक्टोबरपासून राहुरी येथे सुरु असलेल्या आंदोलनात राजूभाऊ शेटे, सत्यवान पवार, कैलास तनपुरे हे गेल्या ४ दिवसांपासून दिवस भर उपोषण करून साखळी उपोषणात सहभाग नोंदवत होते. जरांगे पाटील यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याने रात्री उपोषण मागे घेण्यात आले.

Ahmednagarlive24 Office