अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात सव्वा तीन लाख कुणबी नोंदी सापडल्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सव्वा तीन लाख कुणबी नोंदी सापडल्या असून राज्यात एकुण मराठा समाजाच्या आजपर्यंत ३२ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. याचा दिड ते दोन कोटी मराठा समाज बांधवांना लाभ मिळणार आहे.

मराठा समाजाचे आरक्षण हे ओबीसीमध्येच असून हेच आरक्षण ७० वर्षापूर्वी मिळाल असतं तर जगाच्या पाठीवर मराठा सगळ्यात श्रीमंत आणि प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिली असती.

मराठा आरक्षणासाठी सुरु केलेला संघर्ष अंतिम टप्यात आहे. आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी एक इंचही मागे हटणार नसून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जुन्या बाजार तळावर गुरुवारी (दि.२३) झालेल्या मराठा आरक्षणाच्या विराट मेळाव्यात ते बोलत होते. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे ११ जेसीबीच्या सहाय्याने फुलांची पुष्पवृष्टी करत बोधेगाव नगरीत स्वागत करण्यात आले.

जरांगे पुढे म्हणाले की, मराठ्यांनी इतरांना आरक्षण देताना विरोध केला नाही. उलट अडचणींच्या काळात अन्याय झालेल्या जातीचं रक्षण करण्यासाठी घावून गेला. तसेच मराठ्यांनी कधीच जात शोधली नाही,

कारण कधीकाळी हे आपल्या मदतीला धावून येतील, या भावनेतून सगळ्यांना साथ दिली. परंतु आज परिस्थिती वेगळी झाली आहे. मराठ्यांच्या बाजुने उभं न रहाता त्यांना सगळ्या बाजुने घेरलं जात असल्याचा आरोप सरकारवर केला आहे.

Ahmednagarlive24 Office