अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एक तरुण विद्युत प्रवाहच्या पोलवरील तारेला चिकटून त्याचा दुर्देवी अपघाती मृत्यु झाला आहे. विलास अशोक देसाई (वय ४१ वर्ष ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान मयत विलास हा घरात एकुलता एक कमवता मुलगा होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, १ मुलगा व 2 मुली असा परिवार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, घराचा वीज पुरवठा गेल्या २ दिवसापासुन बंद होता या बाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला होता.
महावितरणचा कर्मचारी घटनास्थळी आला व विलास यास तु पोलवर चढुन विज जोडून घे असे म्हणून फिडर वरुन विज प्रवाह बंद करुन घटनास्थळी आला.
त्याच वेळी दुसऱ्या फिडरवरुन विज प्रवाह सुरुच होता. ही बाब सांबधीत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही. कट केलेली विज जोडणी करण्यासाठी विलास पोलवर चढला.
परंतु दुसऱ्या फिडरवरुन विज प्रवाह सुरु असल्यामुळे त्याला जोराचा शाँक बसला व तो फेकला गेला. परंतु त्याचा पाय वरच अडकला
तसेच पोलवरील अँंगलला पँट अडकल्यामुळे तो जागेवरच मयत झाला. विलासला तातडीने साखर कामगार हाँस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले .