गळफास घेत एकाची आत्महत्या ! पंचक्रोशीत खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : तळेगाव दिघे येथील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात गळफास घेत एकाने आत्महत्या केली. भागवत बाळा दिघे (वय ४५), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

काल मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दिघे येथील रहिवासी भागवत बाळा दिघे यांचा मृतदेह तळेगाव शिवारातील जोर्वेकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान स्टोन क्रशर परिसरात शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत पोलीस पाटील अनिल कांदळकर यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे, दत्तात्रय बडदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह झाडावरून खाली घेतला व सायंकाळच्या सुमारास घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर व्यक्तीने आत्महत्या का केली? याची अधिक माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे अधिक तपास करीत आहे. आत्महत्येच्या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe