अहमदनगर बातम्या

राहुरीत आ.तनपुरेंची ताकद वाढली! मोठ्या प्रमाणावर युवा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढताना दिसून येत असून अनेक तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेशाचा ओघ वाढताना दिसून येत आहे.

जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसं तसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेशाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येत आहे.इतकेच नाहीतर प्राजक्त तनपुरेंनी प्रचारात देखील मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर गाव भेटी आणि प्रचार फेऱ्यांचे आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

यामध्ये तरुणाईचे पाठबळ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरेल असे सध्या राहुरी विधानसभा मतदारसंघात चित्र दिसून येत आहे. जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसं तसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत पक्षप्रवेश वाढले
जसजशी एक एक दिवस निवडणूक जवळ जवळ येऊ लागली आहे तसं तसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढत चालली आहे.

त्यांच्यासारख्या नेतृत्वावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर तरुण कार्यकर्त्यांचा विश्वास वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील डिग्रसचे माजी उपसरपंच राजेंद्र आघाव, राहुल भिंगारदे, खडांबे बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे माजी सरपंच यशवंत ताकटे,

पाथर्डी तालुक्यातील धारवाडी चे माजी सरपंच बापूसाहेब गोरे व नवनाथ रणसिंग सातवड इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता व त्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वागत देखील करण्यात आले. यावेळी बाबासाहेब भिटे तसेच नितीन बाफना, उपसरपंच रावसाहेब पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिंगारदे, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर पवार यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी डिग्रज ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे तसेच ललित घुले, राजू कसबे, प्रतिभा कोकाटे, सुभाष बेलेकर तसेच संदीप गावडे, प्रवीण भिंगारदे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तसेच खडांबे बुद्रुक येथील माजी सरपंच यशवंत ताकटे तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा काल आमदार तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश झाला व या प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी देखील अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील माजी सरपंच बापूसाहेब गोरे व नवनाथ रणसिंग यांनी देखील आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

अशा पद्धतीने अनेक गावातील सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे नक्कीच आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद या निवडणुकीत वाढेल यात शंका नाही.

Ajay Patil