अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संक्रमणात वाढ होत असून ही चिंतेची बाब बनली आहे. परंतु यात रिकव्हरीचे प्रमाण चांगले असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे.
शुक्रवारी जिल्ह्यातील श्रीगोंदे फॅक्टरी येथील दहा महिन्यांच्या बाळाने कोरोनावर मात केली. यासह आणखी चार जण कोरोना मुक्त झाले. शुक्रवारी देखील नगर शहरासह जिल्ह्यातील ७२ जणांच्या लाळेचे नमुने नगरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सदरचे अहवाल येणे अजून बाकी आहे. शुक्रवारी एकूण ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ९५ झाली आहे.
येथील बूथ हॉस्पिटलमधून या बालकासह पिंपळगाव खांड (ता. अकोले) येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि १८ वर्षीय युवती, नेवासे बुद्रूक येथील २४ वर्षीय युवकाला शुक्रवारी घरी सोडण्यात आले.
संगमनेर येथील ६५ वर्षीय व्यक्तीही कोरोनामुक्त झाला. मात्र, त्या रुग्णाला एक दिवस देखरेखीखली ठेवण्यात येणार असून सध्या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार असून उद्या त्याला घरी सोडण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews