अहमदनगर बातम्या

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 138 उमेदवारी अर्ज दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडू लागला आहे. नुकतेच अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 138 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न बारगळल्यामुळे भाजप बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे पक्षही स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत.

मनसेही सर्व जागा लढविण्याचा इरादा बोलून दाखविला आहे. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे ओबीसीं साठी राखीव असलेल्या चार जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, त्यामुळे आता तेराच जागांसाठी निवडणूक होणार आहे.

दरम्यान सोमवारी 14 उमेदवारांचे 25 अर्ज दाखल होते. तर मंगळवारी शेवटच्या दिवशी उमेदवार व त्यांचे समर्थकांनी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती.

माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कुणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

दुसरीकडे आ. डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सर्व प्रभागात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

काँग्रेस आणि शिवसेनेनेही असेच उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व प्रभागात अर्ज दाखल केले असले तरी महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलणी सुरूच राहील. 13 डिसेंबर पर्यंत महाविकास आघाडी अस्तित्वात येईल असा विश्वास डॉ. लहामटे यांनी व्यक्त केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office