अहमदनगर बातम्या

सख्खा भाऊ पक्का वैरी, पहा हा भाऊ काय करायला निघालाय?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News:भावकीचा वाद सर्वत्र असतो. दिवाणी न्यायालयात आणि पोलिसांकडेही येणाऱ्या बहुतांश तक्रारी या भावकीच्या आणि बांधाच्या वादाच्या असतात. जमीन विकून भावाला अद्दल घडविणारेही कमी नाहीत, तर खूपच वैताग झाला तर भावाचे खून केल्याच्या घटनाही घडतात.

शेवगाव तालुक्यात अशाच एका वैतागलेल्या भावाने नामी युक्ती केली आहे. त्याने चक्क आपली जमीनच विकायला काढली असून तसे फलक शेतात लावले आहे. शेवगाव तालुक्यात जायवाडी धरण परिसरातील या भावाचा हा फलक सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

या भावाने आपल्या शेतात लावलेला हा फलक व्हायरल झाला. त्यावर त्याचा क्रमांकही आहे. तेव्हा राज्यभरातून अनेकांनी त्याला फोन केले. त्यावरून मिळालेली माहिती अशी की त्याची या परिसरात पाच एक जमीन आहे.

मात्र त्याचा भावाशी वाद आहे. त्याच्या त्रासामुळे जमीन कसणे अवघड झाल्याने त्याने ती विकायलाच काढली. त्यासाठी असा फलक लावला आहे.त्याला आता दूरदूरवरून फोन येऊ लागल्याने फोन बंद करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

जमीन खरेदी करण्यापेक्षा असे का केले, याची विचारणा करण्यासाठीच फोन येत आहेत. उत्तर देऊन थकलेल्या या भावाने आता फोन बंद ठेवला आहे. जमीन वादाची असणार, हे माहिती असल्याने ती खरेदी करण्यात रस दाखविण्यापेक्षा नेमका वाद काय आहे, हे जाणून घेण्यातच लोकांनी रस दाखविल्याचे कळते. या भावाच्या भावाती यावर प्रतिक्रिया काय आहे, हे मात्र समजू शकले नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office