कोरोना रुग्णांसाठी जागृक नागरिक मंचाचा अनोखा उपक्रम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून याचाच फायदा घेत काही रुग्णालयांकडून रुग्णांची हेळसांड होत असल्याचे प्रकार समोर आले. तसेच कोरोना रुग्णांना सरकारी व खासगी रुग्णालयांतूनही अनेक अडचणी येत आहेत.

कोणाला बेड मिळत नाही तर कोणाला व्हेंटिलेटर, कोणाला चांगले जेवण मिळत नाही तर कोणाची खासगी रुग्णालयांकडून लुटमार होते, अशा अनेक प्रकारच्या पोस्ट राज्यभरातून सोशल मिडियावर असतात.

आता अशा रुग्णांच्या समस्यां सोडविण्यासाठी नगरमध्ये जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे.

राहुरीतील एका रुग्णाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यात त्यांना यश आल्यावर अशा अडचणी भेडसावणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे.

कोरोना बाधित रुग्णांवर सरकारी व खासगी रुग्णालयात नेमके काय उपचार होतात, याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाही.

त्यामुळे अशा रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी जागरूक नागरिक मंचाची हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला. राहुरीच्या रुग्णाला सिव्हीलमध्ये जाऊन मदत केल्यानंतर सुहासभाई मुळे

यांनी जागरूक नागरिक मंचातर्फे हेल्पलाइन नंबर 8275199100 जाहीर केला व कोणाला काही अडचण असल्यास ते अथवा त्यांचा पेशंट ॲडमिट असलेल्या ठिकाणाचे नाव,

स्वतःचे नाव व ज्या ठिकाणी अॅडमीट त्याचा पत्ता व फोन‌ नंबर तसेच येत असलेल्या अडचणीचे थोडक्यात स्वरूप 8275199100या नंबरवर ‘एसएमएस’ करण्याचे आवाहन केले आहे.

जागरूक नागरिक मंचाद्वारे तातडीने त्यांच्या मदतीला जाण्याची ग्वाहीही दिली. तसेच सदर नंबरवर कृपया कुणीही फोन न करता फक्त स्वतःचे नाव, सेंटरचा पत्ता व अडचणींचे स्वरूप ‘एसएमएस’ केले असता खात्रीने मोफत मदत मिळेल, असेही आवर्जून स्पष्ट केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24