आरोपींना अटक न केल्याने उपोषण करण्याचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-पेडगाव येथील जयसिंग दत्तात्रय भिंताडे यांच्यावर त्यांचे थोरले बंधू मोहन व त्यांच्या दोन मुलांनी बेलवंडी शिवारातील शिंदेवाडी येथील पुलावर जीवघेणा हल्ला करत जबरी मारहाण केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, आरोपी राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. दुसरे भाऊ रुपचंद यांनाही ते जीवे मारण्याची धमकी देत असल्याने आरोपींना अटक करावी यासाठी फिर्यादी जयसिंग व त्यांच्या कुटुंबीयांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

जयसिंग आणि रुपचंद यांचे श्रीगोंदे येथील त्यांचे थोरले भाऊ मोहन यांच्याशी ट्रॅक्टरच्या कारणावरून वाद झाला होता. जयसिंग हे १० ऑक्टोबरला बेलवंडी शिवारात जात असताना मोहन व त्यांची मुले आदित्य व अनिरुद्ध यांनी दुचाकीला चारचाकी गाडी आडवी लावून जबरी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

रुपचंद यांना रस्त्यात अडवून पोलिसांचे व आमचे मैत्रीचे संबंध असून पोलिस आमचे काही एक वाकडे करु शकत नाही, असे सांगत आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींना अटक न केल्यास २६ ऑक्टोबरला बेलवंडी पोलिसांच्या विरोधात श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जयसिंग व रुपचंद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24